राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

By सचिन काकडे | Updated: December 5, 2022 14:06 IST2022-12-05T13:19:48+5:302022-12-05T14:06:15+5:30

कोणतीही व्यक्ती असो किंवा राजकीय पक्ष प्रत्येकानेच महापुरुषांचा आदर राखायला हवा

Protest in Delhi for the transfer of Governor, Shivendrasimharaje Bhosale advice to Udayanaraje Bhosale | राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

सातारा : राज्यपालांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करुन काय उपयोग? जर आंदोलन करायचंच असेल तर दिल्लीत जा, तिथे आंदोलन करा? असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.

सातारा पालिकेच्या घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी सकाळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन दिले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोणतीही व्यक्ती असो किंवा राजकीय पक्ष प्रत्येकानेच महापुरुषांचा आदर राखायला हवा.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे; परंतु त्याचा काही एक उपयोग नाही. त्यांच्या बदलीचा निर्णय हा केंद्रातून होतो. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत जावे, तिथे आंदोलन करावे. असा टोला खा. उदयनराजे भोसले यांना लगावला.

आम्ही आमच्या पद्धतीने योग्य तो निषेध केला आहे. आमच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नक्कीच योग्य तो निर्णय घेतील, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

Web Title: Protest in Delhi for the transfer of Governor, Shivendrasimharaje Bhosale advice to Udayanaraje Bhosale