gram panchayat election: साताऱ्यातील हिंगनोळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून उमेदवारांची मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:36 IST2022-12-01T13:35:08+5:302022-12-01T13:36:16+5:30
मिरवणुकीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

gram panchayat election: साताऱ्यातील हिंगनोळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून उमेदवारांची मिरवणूक
अजय जाधव
उंब्रज: ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या कराड तालुक्यातील हिंगनोळे गावातील एका पँनेलच्या उमेदवारांची चक्क घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणूक लागली की, गावातील वातावरण ढवळून निघते.त्यातच सद्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे 'मीच सरपंच होणार' म्हणून अनेकांनी शड्डू ठोकलेत. त्या पद्धतीने फिल्डींग लावण्यात सुरुवात केली आहे. अशी सर्वत्र परिस्थिती असतानाच हिंगनोळे गावातील सह्याद्री पँनेलच्या सरपंच व सदस्य पदांच्या पुरुष उमेदवारांची फेटे बांधून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
या पँनेलच्या उमेदवारांच्या बरोबर नेते, कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत ग्रामदैवताचे दर्शन घेतले. सर्वजण अर्ज भरण्याची कराडकडे रवाना झाले.