साताऱ्यात खासगी शाळेच्या शिक्षकांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:22 IST2019-10-14T17:16:40+5:302019-10-14T17:22:05+5:30

भाडे देण्याघेण्यावरून खासगी शाळेतील शिक्षकांना घर मालकाने कोंडून शाळेच्या आवारातील कुंड्याची तोडफोड केल्याचा प्रकार करंजेमध्ये घडला.

Private school teacher locked up in Satara | साताऱ्यात खासगी शाळेच्या शिक्षकांना कोंडले

साताऱ्यात खासगी शाळेच्या शिक्षकांना कोंडले

ठळक मुद्देसाताऱ्यात खासगी शाळेच्या शिक्षकांना कोंडलेघरमालकावर गुन्हा : भाडे देण्याघेण्यावरून वाद

सातारा : भाडे देण्याघेण्यावरून खासगी शाळेतील शिक्षकांना घर मालकाने कोंडून शाळेच्या आवारातील कुंड्याची तोडफोड केल्याचा प्रकार करंजेमध्ये घडला.

या प्रकरणी प्रवीण चंद्रकांत जाधव (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रवीण जाधव यांच्या इमारतीमध्ये खासगी शाळा भरत आहे.

या इमारतीचे भाडे महिन्याला ३५ हजार आहे. हे भाडे देण्याघेण्यावरून वाद झाला. त्यावेळी जाधव यांनी शिक्षकांना कोंडून ठेवले तसेच शाळेच्या आवारातील १४ कुंड्या फोडून नुकसान केले. हा प्रकार दि. २ आणि १० आॅक्टोंबर रोजी घडला. याबाबत निलोफर खान (वय ३०, रा. मोळाचा ओढा, परिसर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Private school teacher locked up in Satara