खंबाटकी घाटातील खासगी प्रवासी बस उलटली; चार जखमी, वळणावर कठडा तोडून दहा फूट खड्ड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:50 IST2022-10-17T13:48:15+5:302022-10-17T13:50:23+5:30
या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. बाजूला खोल दरी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

खंबाटकी घाटातील खासगी प्रवासी बस उलटली; चार जखमी, वळणावर कठडा तोडून दहा फूट खड्ड्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सातारा बाजूकडे जाताना पहिल्याच वळणावर खासगी बस संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली दहा फूट खोल पलटी झाली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. बाजूला खोल दरी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाट चढताना सकाळी सातच्या सुमारास पहिला टप्पा ओलांडल्यानंतर पुढील वळणावर एक खासगी बस रस्त्याच्या बाजूचा संरक्षक कठडा तोडून महामार्गावरून दहा फूट खाली कोसळली. या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीसांनी अपघातग्रस्तांना मदत करून जखमी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.