साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; सहाजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 10:13 IST2019-10-11T10:12:36+5:302019-10-11T10:13:19+5:30

सातारा येथील सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चार मोबाईल व रोकड असा सुमारे १ लाख ७७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

Print gambling base in Satara; Six were in custody | साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; सहाजण ताब्यात

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; सहाजण ताब्यात

ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; सहाजण ताब्यातकाही दिवसांपासून पाण्याच्या टाकीखाली जुगार सुरू

सातारा : येथील सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चार मोबाईल व रोकड असा सुमारे १ लाख ७७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

बबन पांडुरंग थोरात (वय २८, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार सातारा), लक्ष्मण दत्तू माने (वय ३८, रा. लिंब, ता. सातारा), दिलीप दत्तू पवार (वय ३८, रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विनोद विठ्ठल माने (वय ३६, रा. गोडोली, ता. सातारा), अजित बाळू माने (वय ३६, रा. सदर बझार सातारा), आण्णा लाला माने (वय ४०, रा. पाटखळ, ता. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या टाकीखाली जुगार सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे तत्काळ धाव घेऊन वरील संशयितांना ताब्यात घेतले.

Web Title: Print gambling base in Satara; Six were in custody