साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; चारजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:34 IST2019-09-27T17:05:02+5:302019-09-27T17:34:27+5:30
सातारा शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून चारजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ३ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; चारजण ताब्यात
ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; चारजण ताब्यातसुमारे ३ हजार ४८६ रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त
सातारा : शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून चारजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ३ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
साजिद युसूफ शेख (वय २३, रा. शनिवार पेठ, सातारा), जयदीप पोपटराव यादव (वय ३६, रा. वाढे, ता. सातारा), उमेश उत्तम तपासे (वय ३०, रा. मल्हार पेठ, सातारा), यासिन गदिलावर शेख (रा. गुरुवार परज, सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
हे सर्वजण नकाशपुरा पेठेमध्ये मटका चालवत असताना पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असे सुमारे ३ हजार ४८६ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.