शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाई शहरात जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

वाई : वाई शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. ...

वाई : वाई शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्यासुमारास वाई शहर व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे, ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोग पडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यासह वाई तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोग पडत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही मोठया प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामध्येच शनिवारी संध्याकाळी वाई शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला असला, तरी पावसापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकतेच लागलेले आंबे व मोहर झडून गेला आहे.

ढगाळ वातावरण असेच राहिल्यास आंबा उत्पादन अडचणीत येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. जनावरांसाठी ठेवलेला चारा थोडाफार भिजला असला, तरीही नुकसान मात्र झाले नाही. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये व्यापारी व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अवकाळी पावसाच्या सरी वाई शहरासह वाईच्या पश्चिम भागात पाचवड येथे जवळपास एक तास पडत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

चौकट :

साताऱ्यातही पावसाच्या सरी

साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचप्रमाणे पाऊसही हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळी आठच्यासुमारास तसेच सायंकाळी साडेचारच्यासुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही प्रमाणात पळापळ झाली होती.

फोटो

०९वाई-रेन

वाई शहरात शनिवारी सायंकाळी अचानक मोठा पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. (छाया : पांडुरंग भिलारे)