शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारकडून बजेट तयार : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:38 IST

फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देनिवडणूक डोळ्यासमोर मोदी सरकारकडून ठेवून बजेट तयार: जयंत पाटीलजनतेच्या मनातून मोदी सरकार उतरलंय 

कऱ्हाड : फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असणारी परिवर्तन यात्रा मंगळवारी कऱ्हाडात दाखल झाली. यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते.

सर्वसामान्य जनता आता मोदी सरकारला कंटाळलेली आहे. कारण नुसत्या घोषणा, आश्वासने दिल्याने त्या या सरकारला पूर्ण करता आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातही या सरकारबद्दल लोकांचा राग अनावर झालाय. त्यांच्या मनातून हे सरकार उतरल्याची खात्री वाटते, असेही जयंत पाटील म्हणाले. 

यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, नगरसेवक सौरभ पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी जयंत पाटील म्हणाले, चोरांच्या हातात चाव्या नको, असे मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. त्यांनी हे बोलण्यापूर्वी त्यांच्या सोळा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा. तसेच त्यांच्या सरकारने साडेचार वर्षांत काय दिवे लावलेत, हे मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती आहे.अजित पवार म्हणाले, या सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. भाजपची सर्व पावले ही हुकूमशाही पद्धतीची आहेत. हे सरकार नुसत्या घोषणा देण्याचं काम करतंय.

सातारा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत पुढाकार घेत त्यांना एकत्रित गाडीत घेतले. त्यांच्या गाडीने स्टॉर्टर मारला आहे. गियरही टाकला आहे. आता ही गाडी कोठेही थांबणार नाही, असेही शेवटी अजित पवार यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाच्या प्रश्नाबाबत सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर