पुसेगाव येथील श्री सेवागिरी रथाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

By दीपक शिंदे | Published: December 22, 2022 01:13 PM2022-12-22T13:13:45+5:302022-12-22T13:14:25+5:30

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथपूजन

Pooja by Sri Sevagiri Ratha Minister Radhakrishna Vikhe Patil | पुसेगाव येथील श्री सेवागिरी रथाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

पुसेगाव येथील श्री सेवागिरी रथाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

googlenewsNext

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथपूजन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री संदीपान भूमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मेहश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांनी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची माहिती घेतली. याप्रसंगी मंत्री विखे पाटील व भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Web Title: Pooja by Sri Sevagiri Ratha Minister Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.