साताऱ्यातून बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:28 IST2019-05-30T13:27:14+5:302019-05-30T13:28:06+5:30
सातारा येथील केसरकर पेठेतून श्रेयस महादेव कुंभार (वय १२) या मुलाचे अज्ञातांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.

साताऱ्यातून बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना
सातारा : येथील केसरकर पेठेतून श्रेयस महादेव कुंभार (वय १२) या मुलाचे अज्ञातांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रेयश हा दि. १७ रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घरासमोर खेळत होता. यावेळी अज्ञाताने त्याचे अपहरण केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरातल्यांनी इतरत्र त्याचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही.
गेल्या काही दिवसांपासून त्याचा सातत्याने परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला जात होता. मात्र, अखेर तो न सापडल्याने शंकर खाशाबा कुंभार यांनी अज्ञातांनी श्रेयसचे अपहरण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.