शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस चौकी बंद

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

कोळकी दूरक्षेत्र : सात महिन्यांत एकदाही उघडले नाही दार

नसीर शिकलगार - फलटण  शहरालगत असलेल्या व लोकसंख्येने सर्वांत जास्त असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सात महिहन्यांपूर्वी उभारण्यात आलेले कोळकी पोलीस दूरक्षेत्र उद्घाटनानंतर बंदच राहिले आहे. पोलीस चौकी एका दिवसातच बंद पडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.फलटण शहरालगतच कोळकी गाव आहे. जवळपास १० हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. या गावात बँक, पोस्ट, हॉस्पिटल्स, हॉटेल्स आहेत. लोकसंख्या वाढीमुळे अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर या गावातील नागरिकांनी वारंवार मागणी केल्याप्रमाणे येथे पोलीस दूरक्षेत्र मंजूर करण्यात आले.पोलीस दूरक्षेत्रासाठी मोकळी जागाही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, बांधकाम होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने शेजारीच पोलीस चौकीसाठी गाळा उपलब्ध करून दिला आणि तेथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली. मात्र, उद्घाटनच्या दुसऱ्या दिवसापासून ही पोलीस चौकी बंद आहे, ती अद्याप उघडली नाही. चौकीबाहेर लावलेला फलकही काढण्यात आला आहे, तर ग्रामपंचायतीबाहेर असलेला फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. चौकी का बंद झाली याचे उत्तर कोणालाही सापडत नसून पोलिसांकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उद्घाटन केलेली पोलीस चौकी एका दिवसातच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते झाले होते उद्घाटनसात महिन्यांपूर्वी प्रमुख राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोलीस दूरक्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आवश्यक ते पोलीसबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर आमच्यामुळे गावाला पोलीस चौकी मिळाल्याचे दावे करून सत्ताधारी व विरोधकांनी कलगीतुरा रंगविला. मात्र, आता कुणीच काही बोलत नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते झाले होते उद्घाटनसात महिन्यांपूर्वी प्रमुख राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोलीस दूरक्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आवश्यक ते पोलीसबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर आमच्यामुळे गावाला पोलीस चौकी मिळाल्याचे दावे करून सत्ताधारी व विरोधकांनी कलगीतुरा रंगविला. मात्र, आता कुणीच काही बोलत नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.