पोलीस गुंतले बंदोबस्तात; चौकी बंद- अवेैध धंदे सुरु... रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:50 IST2020-04-30T13:48:37+5:302020-04-30T13:50:54+5:30

पुसेसावळी -(सातारा) :  सगळीकडे कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनाच्या खबरदारीसाठी शासनाकडून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला.परंतु या ...

Police involved in security; Outposts closed - Illegal trades started ... Who will stop them? | पोलीस गुंतले बंदोबस्तात; चौकी बंद- अवेैध धंदे सुरु... रोखणार कोण?

पोलीस गुंतले बंदोबस्तात; चौकी बंद- अवेैध धंदे सुरु... रोखणार कोण?

ठळक मुद्देपुसेसावळीत लॉकडाऊनच्या काळातही अवैध धंदे सुरूचवरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष दयावे अशी मागणी या पुसेसावळी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पुसेसावळी -(सातारा) :  सगळीकडे कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनाच्या खबरदारीसाठी शासनाकडून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला.परंतु या लॉक डाऊन च्या काळातही पुसेसावळी ता.खटाव येथे अवैध धंदे सुरूच असल्याचे चित्र समोर आले.

काल बेकायदा बिगरपरवाना वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी ४ लाख९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ताडीची वाहतूक करणाऱ्या दोघां कडून 5 लिटर ताडी सह मोटर सायकल असा सुमारे 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेउन दोन तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


तरी ही कारवाई औंध येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार केली. पुसेसावळी बीटचे अधिकारी म्हणून काम करणारे पोलीस हवालदार यांना या अवैध धंद्याविषयी माहिती नाही का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.वरिष्ठांच्याकडून कारवाई होते. मग हे हवालदार त्यांना नेमून दिलेल्या बीटात काय करतात.

तसेच बंदी असलेला गुटखा देखील खुलेआम विकला जात आहे. लॉक डाउनच्या काळात सुरु असलेल्या अवैध धंद्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी या बीटचे पोलीस हवालदार पाहत असूनही दुर्लक्ष करतात. तंबाखू ,सिगारेट, गुटखा यांची खुलेआम विक्री केली जात असल्याचे दिसत आहे. अवैध धंद्याची माहिती देऊन सुद्धा तेथे जावून शहानिशा करण्याची तसदी घेत नाहीत.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष दयावे अशी मागणी या पुसेसावळी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

Web Title: Police involved in security; Outposts closed - Illegal trades started ... Who will stop them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.