Police Inspector Pradeep Kumar Jadhav transferred | पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची बदली
पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची बदली

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची बदली त्यांच्या जागी कोणाची वर्णी ?

सातारा : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. जाधव यांनी वर्षेभरापूर्वी शहर पोलीस ठाण्याचा पद्भार स्वीकारला होता.

पोलीस निरीक्षक जाधव हे यापूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या काळात त्यांनी सोन साखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता.

तसेच खून, दरोड्यासह अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. दरम्यान, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप पुढे आले नाही.

Web Title: Police Inspector Pradeep Kumar Jadhav transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.