वाठार येथे १३ घोरपडीसह शिकारी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:21 IST2019-12-07T14:19:40+5:302019-12-07T14:21:47+5:30
डोंगर कपारीतून १३ जिवंत घोरपडी पकडून त्याची शिकार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस आणि वनविभागाच्या भरारी पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

वाठार येथे १३ घोरपडीसह शिकारी पोलिसांच्या ताब्यात
सातारा : डोंगर कपारीतून १३ जिवंत घोरपडी पकडून त्याची शिकार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस आणि वनविभागाच्या भरारी पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार स्टेशन परिसरातील डोंगर कपारीतून एक व्यक्ती घोरपडी पकडून त्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वनविभाग आणि पोलिसांनी सापळा रचून श्रीरंग श्रीपती चव्हाण (वय ६०, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) या व्यक्तीला अटक केली.
त्याच्याकडून १३ जिवंत आणि एक मृत घोरपड जप्त करण्यात आली. चव्हाण हा कुत्र्याच्या साह्याने घोरपडींची शिकार करत होता. शिकार केल्यानंतर या घोरपडी तो कोणाला देत होता, हे अद्याप तपासात समोर आले नाही. घोरपडीच्या चमडीपासून औषध तयार केले जाते, असा समज असल्याचे पोलिसांनी सांगितले.