केदार हायस्कूलमध्ये वृक्षारोपण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:56+5:302021-06-22T04:25:56+5:30
तांबवे : सुपने, ता. कऱ्हाड येथील केदार हायस्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. केदारनाथ शिक्षण संस्थेच्या केदार विद्यालयाने नुकतेच ...

केदार हायस्कूलमध्ये वृक्षारोपण उपक्रम
तांबवे : सुपने, ता. कऱ्हाड येथील केदार हायस्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. केदारनाथ शिक्षण संस्थेच्या केदार विद्यालयाने नुकतेच सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत शैक्षणिक वाटचालीचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला. यानिमित्ताने विद्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ पाटील फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी माजी मुख्याध्यापक एच. डी. पाटील, शिवाजी पाटील, डॉ. धनंजय जाधव, निवृत्त शिक्षक जे. टी. पाटील, लक्ष्मण शिंदे, आत्माराम माळी, सुहास पाटील, सचिन महाडिक, शिक्षक रमेश भोसले, एस. एन. पाटील, व्ही. जी. चव्हाण, शिदोजी पाटील उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेमुळे शाळेचे रूपडे पालटले
सणबूर : येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर चौधरी यांच्या पुढाकाराने प्राथमिक शाळेच्या आवारात साफसफाई करण्यात आली. त्यामुळे शाळा परिसराचे रूपडे पालटले आहे. गत चार महिन्यांपासून शाळा बंद असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. झाडे, झुडपे उगवल्याने अवकळा पसरली होती. काही युवकांनी सामाजिक कार्यकर्ते शंकर चौधरी यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबविली. झाडे, झुडपे, गवत, दगड हटवून ट्रॅक्टर ब्लेडच्या साहाय्याने जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. सोमनाथ पाटील, अभिजित कडव, शंकर चौधरी, सतीश आलेकर, सतीश फल्ले, रविकांत रेडीज, नितीन बेलागडे, संतोष कदम, अभिजित शेटे, संतोष शेटे, बाबु बेलवनकर, वरद पानारी यांनी सहभाग घेतला होता.
खरीपपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त
कऱ्हाड : आठ दिवसांपासून पाऊस कऱ्हाड परिसरात हजेरी लावत आहे. शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पावसावर खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. आठ दिवसांपासून जोरदार पाऊस तालुक्याला झोडपून काढीत आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले होते. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे पाण्याचा निचरा झाला असून शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागती सुरू केल्या आहेत. सध्या नांगरट, कुळवट, सरी सोडणे, खत टाकणे आदी कामे सुरू आहेत.