पावसामुळे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:55+5:302021-06-22T04:25:55+5:30

सातारा : शहरात गेल्या तीन दिवसांत झालेल्या धुवाधार पावसाने अनेक रस्ते खराब झाले आहेत. खड्ड्यांनी अक्राळ-विक्राळ स्वरूप घेतले आहे. ...

Pits due to rain | पावसामुळे खड्डे

पावसामुळे खड्डे

सातारा : शहरात गेल्या तीन दिवसांत झालेल्या धुवाधार पावसाने अनेक रस्ते खराब झाले आहेत. खड्ड्यांनी अक्राळ-विक्राळ स्वरूप घेतले आहे. मुख्य रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हे खड्डे तातडीने मुजविण्याची मागणी होत आहे.

माधवी जाधव यांना पदोन्नती

सातारा : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातील नायब तहसीलदार व मर्ढे ता. सातारा येथील माधवी जाधव यांची तहसीलदारपदी पदोन्नती झाली. राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत नायब तहसीलदारपदी माधवी जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पन्हाळा येथे नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावली आहे.

पर्यटकांचा ओघ

सातारा : पावसाचा मोसम आणि लॉकडाऊनची पर्वणी साधून अनेक पर्यटकांनी सोमवारी कास, बामणोली, ठोसेघर या भागांत पर्यटनाला जायला पसंती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरीच राहणाऱ्यांनी पुरेशी काळजी घेऊन सोमवारी फिरणं पसंत केले.

अमोल काळेल यांची निवड

सातारा : वळई ता. माण गावचे व सध्या येथील कांगा कॉलनीतील रहिवाशी अमोल शंकर काळेल यांची सैन्य दलात कर्नलपदी निवड झाली आहे. त्यांचे शालेय शिक्षण येथील सैनिक स्कूलमध्ये झाले आहे.

Web Title: Pits due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.