शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

तब्बल ९०५ जणांच्या हातात पिस्तूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:34 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : कºहाड हा संवेदनशील उपविभाग. येथे अनेक गुन्हेगारी कारवाया घडतात. या गुन्हेगारी ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कºहाड हा संवेदनशील उपविभाग. येथे अनेक गुन्हेगारी कारवाया घडतात. या गुन्हेगारी वृत्तींचा सामना अनेकवेळा सामान्यांनाही करावा लागतो. हे करीत असताना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची वेळही अनेकांवर येते. सध्या कायदेशीर सोपस्कार पार पाडून तब्बल ९०५ जणांनी आपल्या कमरेला पिस्तूल अडकवलंय. एकट्या कºहाड उपविभागात ही धक्कादायक परिस्थिती आहे.पैसा, मालमत्ता, पूर्ववैमनस्य किंंवा संघर्षाच्या माध्यमातून अनेकवेळा काहीजणांवर जीवघेणा प्रसंग येतो. संबंधित व्यक्तीभोवती गुन्हेगारी कारवायांचा फास आवळला जातो. गुन्हेगारी वृत्ती, पैसा, मालमत्ता किंवा संघर्षाच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या जीवावरही उठतात. त्यामुळे या गुन्हेगारी कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काहींवर शस्त्र बाळगण्याची वेळ येते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाकडून अशा अर्जदारांना शस्त्र बाळगण्याचा रितसर परवाना दिला जातो; मात्र, असा परवाना देतानाही प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी होते. त्याने ज्या कारणास्तव शस्त्राच्या परवान्याची मागणी केली आहे, त्या कारणाचीही खातरजमा केली जाते.त्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी, उत्पन्न, एकूण मालमत्ता, दैनंदिन उलाढाल, आयकर देयक याचीही चौकशी होते. सध्या परवान्याची ही कार्यवाही आणखी कडक करण्यात आली आहे.कºहाड उपविभागाचा विचार करता येथे कायदेशीररीत्या स्वत:सोबत शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या तब्बल ९०५ आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांसह, बिल्डर, उद्योजक तसेच बंदूक वापरणाºया शेतकºयांचाही समावेश आहे. संबंधितांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून शस्त्र स्वत:सोबत ठेवण्याचा परवाना घेतला आहे. शस्त्र बाळगणाºयांची ही संख्या आश्चर्यकारक नसली तरी धक्कादायक निश्चितच आहे. मुळातच गत काही महिन्यांपासून कºहाड शहरासह परिसरातील गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या आहेत. खून, मारामारी यासारख्या घटनांनी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच ८९६ जणांमध्ये विविध कारणास्तव असुरक्षिततेची भावना असेल तर ते धक्कादायकच म्हणावे लागेल.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यवाहीस्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव पडताळणीसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. पोलिसांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तो पोलीस अधीक्षकांकडे व तेथून जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येतो. या प्रक्रियेनंतरच संबंधिताला शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळतो.२०९ शेतकºयांकडेही परवानावन्य श्वापद किंवा रानटी प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होत असेल तर शेती संरक्षणासाठी म्हणून प्रशासनाकडून शेतकºयांना शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो. या परवान्यावर शेतकरी सिंंगल किंवा डबल बारची बंदूक वापरू शकतात. कºहाड उपविभागात बंदूक बाळगणाºया शेतकºयांची संख्या २०९ आहे.स्वसंरक्षण किंवा शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याच्या घेतलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच शस्त्राचा गैरवापर केल्यास संबंधित परवाना रद्द अथवा काही कालावधीसाठी निलंबितही केला जातो.