किंग कोब्रासोबत फोटो; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा, कोडगू येथील फॉरेस्ट मोबाइल पथकाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र केला तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:05 IST2025-09-13T14:04:26+5:302025-09-13T14:05:09+5:30

सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर वनाधिकारी सावध झाले

Photo with King Cobra Crime against two people from Satara | किंग कोब्रासोबत फोटो; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा, कोडगू येथील फॉरेस्ट मोबाइल पथकाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र केला तपास

किंग कोब्रासोबत फोटो; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा, कोडगू येथील फॉरेस्ट मोबाइल पथकाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र केला तपास

कराड : गत महिन्यात कोडगू येथे दाखल झालेल्या कथित किंग कोब्रा फोटोशूट आणि बेकायदेशीर बंदी प्रकरणाचा तपास कोडगू येथील फॉरेस्ट मोबाइल पथकाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र केला आहे. या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील दोन आणि कोडगू येथील दोन सापांना वाचवणाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

रोशन अम्माथी आणि नवीन राकी, रा. कोडगू व विकास जगताप व किरण आहिरे (रा. जकातवाडी सातारा) त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. कोडगू जिल्ह्यातील रोशन, अम्माथी आणि नवीन राकी, पोन्नमपेट येथील तर सातारा येथील नेचर अंड सोशल फाउंडेशनचे विकास जगताप, किरण आहिरे यांना सरपटणाऱ्या प्राण्यासोबत फोटोशूट करण्यासाठी इच्छुक ‘क्लायंट’ना ऑफर करण्यासाठी एका किंग कोब्राला बंदिस्त ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

रोशनची सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर वनाधिकारी सावध झाले. जेथे तो दोन किंग कोब्रा हाताळताना दिसत होता, जे तज्ज्ञांच्या मते दुर्मीळ आहे. या प्रकरणातील विकास जगताप आणि किरण अहिरे यांना कोडगू येथील तपासात समाविष्ट केले आहे. कोडागू येथील फॉरेस्ट मोबाइल स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी सातारा येथील विकास जगताप, किरण आहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कार पकडली; पण साप सापडला नाही

स्थानिक पातळीवर वाचवलेल्या एका किंग कोब्राचे छायाचित्र घेण्यासाठी कोडगूला गेले होते. किंग कोब्रा आणि लोकेशनवरील त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांचा पाठलाग करणाऱ्या फॉरेस्ट मोबाइल स्क्वॉड गुप्तहेरांना ते कोडगूमध्ये असल्याची सूचना मिळाली. काही तासांपूर्वी ते निघून गेले. गुप्तहेरांना माहिती मिळाली की दोघे त्यांच्या खासगी कारमध्ये किंग कोब्रा घेऊन जात आहेत. 

फॉरेस्ट मोबाइल स्क्वॉड कोडगूने बेळगावी पथकाला सतर्क केले आणि त्याच संध्याकाळी कार बेळगावी येथे पकडली. त्यांच्या ताब्यात कोणताही साप सापडला नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आले; परंतु त्यांच्या मोबाइल फोनवरून किंग कोब्रासोबत पोज देताना डझनभर फोटो उघड झाले. म्हणून त्यांना कोडगूला परत येण्यास नोटीस बजावून सांगण्यात आले; परंतु त्यांनी तसे केले नाही. सहायक वनसंरक्षक गणश्री यांच्यानुसार विकास जगताप, किरण आहिरे यांनी केलेल्या कृत्याचा कबुली जबाब दिला आहे.

Web Title: Photo with King Cobra Crime against two people from Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.