शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटण पालिका कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:52 IST

फलटण : पद्मावतीनगर, ता. फलटण येथे करवसुलीसाठी गेलेले कर अधिकारी राजेश भीमराव काळे (वय ५७) व पालिका कर्मचारी हजरत ...

फलटण : पद्मावतीनगर, ता. फलटण येथे करवसुलीसाठी गेलेले कर अधिकारी राजेश भीमराव काळे (वय ५७) व पालिका कर्मचारी हजरत कोतवाल यांना शिवीगाळ करून एका कर्मचाऱ्याच्या थेट कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी मीनाक्षी भीमराव मोटे व सौरभ भगवानराव मोटे (दोन्ही रा. पद्मावती नगर, ता. फलटण) यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, रविवारी दि. ०१ मार्च २०२६ रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास पालिकेचे कर अधिकारी, वसुली लिपिक आणि शिपायांचे एक पथक पद्मावतीनगर येथे करवसुलीसाठी गेले होते. एका थकबाकीदार महिलेची घरपट्टी अनेक वर्षांपासून थकीत असल्याने पथकाने त्यांना कर भरणा करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.संबंधित नागरिक थकीत बिल भरत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, नगरपालिकेच्या पथकातील एका कर्मचाऱ्याने त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईचा राग आल्याने संबंधित महिला आणि घरातील एका तरुणाने कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात अपशब्द वापरत शिवीगाळ व दमदाटी केली.नागरिकांकडून सुरू असलेला हा प्रकार पथकातील एक शिपाई आपल्या मोबाइलमध्ये चित्रित करत होता. हे पाहताच संबंधित महिलेने थेट त्या शिपायाच्या अंगावर धावून जाऊन त्याच्या गालावर जोरात चापट मारली आणि त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. याप्रकरणी दाेघांवर फलटण शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Faltaan Municipality worker slapped; Case filed against two.

Web Summary : Falton: Two booked for assaulting a municipality worker during tax collection. The incident occurred after a dispute over unpaid property taxes led to the worker initiating disconnection of water connection.