शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Coronavirus Unlock : लोकांचे जगण्याचे वांदे, हातावर पोट अन् पोटाला चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 3:44 PM

कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना अक्षरश: उपाशीपोटी राहावे लागत आहे. काम करायची इच्छा असली तरीही घरात बसून राहावे लागलेल्या या हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जगण्याचे वांदे झाले आहेत.

ठळक मुद्देलोकांचे जगण्याचे वांदे, हातावर पोट अन् पोटाला चिमटाचहा, वडापाव गाड्या सुरू करण्यात अडचणी

सातारा : कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना अक्षरश: उपाशीपोटी राहावे लागत आहे. काम करायची इच्छा असली तरीही घरात बसून राहावे लागलेल्या या हातावर पोट असणाऱ्या लोकांचे जगण्याचे वांदे झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या लोकांना पोटाला चिमटा लावूनच दिवस काढावे लागत आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन आहे. त्याच्या आधी देखील अधून मधून दुकाने बंद राहिली होती. गर्दीच्या ठिकाणी तसेच बँका, पतसंस्था, सरकारी कार्यालय, सहकारी कार्यालय तसेच बाजारपेठांमध्ये चहा, वडापावच्या टपऱ्या चालवून आपला उदरनिर्वाह चालवतात.

पहिल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या लोकांचे हात बांधून पडलेले आहेत, यापैकी काहींनी अजून मधून घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न केला; पण मात्र त्यांच्याजवळ कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद पडले.आता जिल्हाधिकाऱ्यांनी लाकडांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असून, हॉटेल रेस्टॉरंटमधील पदार्थ घरपोच मिळणार आहेत. मात्र, आता चहाच्या तसेच वडापावच्या टपºया चालू करायच्या कशा? याबाबत संभ्रमावस्था असल्याने हे व्यवसाय अजूनही सुरू झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले तर सर्वसामान्य लोकांना आपला उदरनिर्वाह चालवतात येऊ शकेल. 

अधिकाऱ्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून बनलेले पदार्थ घरपोच देण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मोठ्या हॉटेल व्यावसायिकांकडे सर्व यंत्रणा असते. आमच्याकडे केवळ चहा पिण्यासाठी लोक येतात. आता हा गाडा बंद राहिल्याने कुटुंबात कसे चालवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपऱ्यांना देखील सुरू करण्यास परवानगी द्यावी.- सतीश सुतार, टपरी चालक

अजब फतव्याने गोरगरीब अचंबितकष्टकऱ्यांना घरात बसून राहण्याची सवय नसेल रोजचा दिवस काबाडकष्ट करायचे आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालवायचे, असा प्रत्येकाचा दिनक्रम असतो; परंतु गेल्या पाच महिन्यांमध्ये अपवाद वगळता हे लोक कामानिमित्त बाहेर पडले आहेत. शासनाच्या फतव्याने गोरगरीब मात्र अचंबित झालेले आहेत.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSatara areaसातारा परिसर