शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मुलांचं गप्प राहणं हाच गुण ‘त्यानं’ हेरला; शाळेत पहाटेच्या अंधारात अश्लील कृत्य, केअरटेकरच्या विकृत कारनाम्याने पालक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:15 IST

सर्वाधिक सहावीतील मुलांवर ‘त्याची’ नजर

सातारा : सातारा शहरातील एका नामांकित शाळेतील तब्बल २४ मुलांचा मानसिक व लैंगिक छळ करणाऱ्या विकृत केअरटेकरचे कारनामे ऐकून पालक अक्षरश: हादरून गेले आहेत. या केअरटेकरने हे अश्लील व धमकीचे सारे कारनामे पहाटेच्या अंधारात केले. जी मुले शांत व गप्प राहत होती. अशी मुले हेरून तो आपला सावज करायचा.केअरटेकरने छळ केलेली सर्वाधिक मुले ही सहावी इयत्तेतली आहेत. काही मुले सातवी आणि नववीतील सुद्धा आहेत. ही सर्व मुले वर्षभरापासून केअरटेकरच्या अश्लील हरकती गप्प गुमान सहन करत होती. याची वाच्यता केली तर आपल्याला शाळेतून काढून टाकले जाईल, याची भीती मुलांना वाटायची. त्यामुळे कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नाही; परंतु एका मुलाने धाडस करून आपल्या वडिलांना संबंधित केअरटेकरच्या घृणास्पद कृत्याविषयी भीतभीत सांगितले. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित शाळेत असा प्रकार घडतोय, याचा पालकांना सुरुवातीला विश्वास बसला नाही. परंतु तो मुलगा जेव्हा रडत रडत सांगू लागला तेव्हा पालकांनी तातडीने मुलाला विश्वासात घेऊन धीर दिला. तत्काळ संबंधित शाळेच्या प्राचार्यांना याची कल्पना दिली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पोलिसशाळा व्यवस्थापनाने चाैकशी केल्यानंतर केअरटेकरच्या कृत्याला २४ मुले बळी पडल्याचे समोर आले. या प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याकडून त्रास सुरू होता. आता या प्रकारामुळे इतर मुलांचे पालक धास्तावले आहेत. आपला मुलगा त्या शाळेत सुरक्षित राहील का, याची चिंता अनेक पालकांना लागली आहे.

‘तो’ २६ वर्षांचा अविवाहित तरुण!संबंधित केअरटेकर २६ वर्षांचा असून, तो अविवाहित आहे. गेल्या चार वर्षांपासून तो त्या शाळेत काम करत आहे. पूर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का, याची माहिती आता पोलिसांकडून घेतली जात आहे. या प्रकारामुळे संबंधित केअरटेकरला तातडीने नोकरीवरून शाळा प्रशासनाने काढून टाकल्याचे पोलिस सांगताहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara School Caretaker Molests 24 Children; Parents Horrified by Actions

Web Summary : A Satara school caretaker sexually abused 24 children, preying on quiet students in the early morning darkness. Sixth-grade students were primarily targeted. Fear of expulsion kept victims silent until one bravely spoke out, leading to the caretaker's dismissal and police investigation.