फी कपातीसाठी पालक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:19+5:302021-06-22T04:26:19+5:30
सातारा : लॉकडाऊनमुळे सर्वांच्याच आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शाळाही ऑनलाईन सुरू असल्यामुळे यंदाची आणि मागील वर्षीची फी कमी ...

फी कपातीसाठी पालक आक्रमक
सातारा : लॉकडाऊनमुळे सर्वांच्याच आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शाळाही ऑनलाईन सुरू असल्यामुळे यंदाची आणि मागील वर्षीची फी कमी करावी, या मागणीसाठी येथील निर्मला कॉन्व्हेंटच्या बाहेर पालकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला.
याबाबत पालक स्वप्नील राऊत यांनी शाळा प्रशासनाला निवेदन दिले आहे. शाळेने मागील व चालू वर्षात ५० टक़्के सवलत मान्य करावी, असे यात नमूद करण्यात आले आहे. कोविडमुळे दोनदा लॉकडाऊनचा फटका असलेल्या अनेक पालकांचा आर्थिकस्तर खालावला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले असले तरीही मुलांच्या शिक्षणासाठी पालक पैसे उभे करण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र, शाळांनीही पालकांचा विचार करून फीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, शाळा प्रशासनाने पालकांच्या शिष्टमंडळाला भेटायला नकार देत एकेक पालकांनी त्यांचे म्हणणे मांडावे, अशी भूमिका घेतली. पालकांकडून सामायिक आणि वैयक्तिक फी माफीचा अर्ज देण्याचा निर्णय पालकांनी घेतला असून, त्यानुसार शाळेने फीमध्ये सवलत दिली नाही तर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा निर्णय पालकांनी जाहीर केला आहे.