शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

‘पळशीच्या पीटी’ची सातासमुद्रापार धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:53 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तसं पाहिलं तर फलटण तालुक्यातील बराचसा भाग हा दुष्काळी. कधी खायलां हाय तर पाणी नाय, अशी काहीशी परिस्थिती. अशा दुष्काळी तालुक्यातील आदर्की या गावी राहणारे धोंडिबा कारंडे यांनी साताऱ्याच्या मातीत सिनेमाच्या रुपाने तयार केलेल्या ‘पळशीची पीटी’ या कलाकृतीने आज सातासमुद्रापार धाव घेतली आहे. या ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तसं पाहिलं तर फलटण तालुक्यातील बराचसा भाग हा दुष्काळी. कधी खायलां हाय तर पाणी नाय, अशी काहीशी परिस्थिती. अशा दुष्काळी तालुक्यातील आदर्की या गावी राहणारे धोंडिबा कारंडे यांनी साताऱ्याच्या मातीत सिनेमाच्या रुपाने तयार केलेल्या ‘पळशीची पीटी’ या कलाकृतीने आज सातासमुद्रापार धाव घेतली आहे. या मराठी चित्रपटाची फ्रान्स येथे होणाºया कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून, या महोत्सवात झळकणारा साताºयाचा हा पहिलाच चित्रपट आहे.मुंबई, पुण्याकडची सिनेसृष्टी गेल्या काही वर्षांत साताºयाकडे सरकू लागली असाताना आता मराठी सिनेमाही कात टाकू लागला आहे. वर्षभरापूर्वी मोहीच्या ललिताबाबरने रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करून जगाचे लक्ष वेधले. धोंडिबा कारंडे यांनी हाचधागा पकडून सिनेमा करण्याचे ठरविले. एका धनगराच्या कुटुंबातील ‘भागी’ या धावपटू मुलीची अडथळ्यांची शर्यत त्यांनी चित्रपट रुपाने पडद्यावर आणली. प्रचंड कष्ट, ओढाताण करून त्यांनी ‘पळशीची पीटी’ हा सिनेमा त्यांनी पूर्ण केला.याचे संपूर्ण चित्रीकरण जिल्ह्यातील भावेनगर, पिंपोडे, भाडळे, सातारा व आदर्की परिसरात करण्यात आले. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व प्रसंगी स्वत:ची जमीन व गाडी विकून धोंडिबा कारंडे यांनी पैसा उभा केला. साताºयाच्या मातीतले हरहुन्नरी कलाकार आणि तंत्रज्ञांनी मोट बांधून त्यांनी सिनेमाचा श्रीगणेशा केला.समस्त सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट अशी या सिनेमाची नुकतीच फ्रान्स येथे होणाºया कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवड झाली आहे. साताºयाच्या दृष्टीने ही गौरवशाली बाब आहे. कारण साताºयाच्या मातीत तयार झालेला अन् कान्स महोत्सवात झळकणारा साताºयातील हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पळशी गावातील ‘भागी’ नावाच्या पीटी उषाची गोष्ट सातासमुद्रापार पोहोचणार आहे.या चित्रपटात संदीप जंगम यांनी छाया दिग्दर्शन आणि संकलन, निखिल गांधी यांनी डीआय, स्क्रीन प्ले म्हणून तेजपाल वाघ आणि महेश मुंजाळे, ध्वनी मयूर सकट, पार्श्वसंगीत विनित देशपांडे, मिश्रण निमिषजोशी, वेशभूषा राजेंद्र्र संकपाळ यांच्यासह प्रशांत इंगवले, रोहिणी शेंडगे, राजभूषण सहस्त्रबुद्धे नीलिमा कमाने यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.‘पळशीची पीटी’ चित्रपटाची यापूर्वीही पुणे इंडिया फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. तसेच या चित्रपटाला विविध तीन नामांकनेही मिळाली आहेत.महाराष्ट्रातील तीन चित्रपटांचा समावेशफ्रान्समध्ये ८ ते १८ मे या कालावधीत कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील तीन चित्रपटांची निवड केली जाते. यंदा इडक, क्षितीज आणि पळशीची पीटी या चित्रपटांची कान्ससाठी निवड झाली आहे.पळशीची पीटी चित्रपटाची ‘कान्स’साठी निवड झाल्याचा आनंद आहे. मात्र, साताºयाच्या मातीसाठी आपण काहीतरी करू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचे नसून सांघिक आहे.- धोंडिबा कारंडे, दिग्दर्शक