भाजप सत्तेवर असताना दिव्यांगांच्या शिक्षणाबाबत दुर्लक्ष केले गेले. आता तर महाविकास आघाडीची सत्ता आहे. या मुलांच्या शिक्षणावरच गदा आणण्याचा छुपा डाव खेळला गेला असून, या मुलांचे भविष्य अंध:कारमय बनले आहे. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचे दुष्परिणाम ...
सध्या चिनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने ८५० हून अधिक चिनी नागरिकांचा बळी घेतला असतानाच साताऱ्यातील अश्विनी अविनाश पाटील या चीनमधील वुहान शहरात अडकल्या आहेत. ...
ठाण्यातील महिला अभियांत्याने दीड महिन्यानंतर साडेचार लाखांचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी साताऱ्यातील अजंठा चौकात घडली होती. याप्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
वायरमनला मारहाण केल्याप्रकरणी रोहिदास हरिभाऊ चव्हाण (रा. साठे, ता. फलटण) याला चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. पवार यांनी १ महिना साधी कैद व एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १० दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...
कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले परराज्यातील युवकाचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनंतर सोमवारी सकाळी शोधपथकाच्या हाती लागला. ...
रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीमध्ये सातारा, सांगली आणि लखनौमधील संशयितांचा समावेश आहे. ...
या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. ...