महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:39 PM2020-02-10T16:39:07+5:302020-02-10T16:39:58+5:30

वाटेत अडवून महाविद्यालयीन युवकाला मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Chen kills and kills a college student | महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली

महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावलीतिघांवर दरोड्याचा गुन्हा

सातारा : वाटेत अडवून महाविद्यालयीन युवकाला मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

विजय उर्फ पिल्या नलवडे, मंगेश चव्हाण, अमर चौगुले, अजय पवार, सचिन पवार (सर्व रा. बोगदा परिसर, समर्थ मंदिर सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,चेतन संतोष पवार (वय २१, रा. डबेवाडी, ता. सातारा) हा महाविद्यालयीन युवक दि. ७ रोजी रात्री मित्रासह दुचाकीवरून घरी निघाला होता.

यावेळी बोगदा परिसरातील पॉवर हाऊसजवळ वरील पाचजणांनी त्यांना अडवले. त्यानंतर लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच चेतनच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेली. या प्रकारानंतर चेतनने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती.


जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

मलकापूर : जखिणवाडी, ता. कऱ्हाडयेथे बिबट्याने हल्ला करत शेळ्यांच्या नरड्याचा चावा घेऊन तीन शेळ्या ठार केल्या. दरम्यान, शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित आरडाओरड केल्यामुळे दोन कोकरे बचावले.

पाटील मळ्यात किसन पाटील यांच्या वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जागीच दोन शेळ्या ठार झाल्या. तर एक गंभीर जखमी झाली. त्या जखमी शेळीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा वनविभागाच्यावतीने करण्यात आला.

Web Title: Chen kills and kills a college student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.