शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:24 IST

कराड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कराड : कराड शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असताना अन्नातील विषबाधा होऊन तब्बल वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे कराड शहरात खळबळ उडाली असून, प्राणिमित्र संघटना आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कराड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कराड शहरामध्ये सध्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्री आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील कासार गल्ली, चावडी चौक, विठ्ठल चौक, कन्याशाला मंगळवार पेठ, आदींसह परिसरात मोकाट कुत्री मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांना दिसून आले.या घटनेनंतर प्राणिमित्र गणेश पवार यांच्यासह ‘बिइंग ह्युमन’ ग्रुपच्या सदस्यांनी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्याशी संपर्क साधून विषबाधेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुत्र्यांच्या घटनेची चौकशी करून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. त्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्यात गणेश पवार यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनासशहरातील विविध ठिकाणी कुत्री विषबाधा होऊन मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक निदर्शनास आले असले तरी एकंदरीत कुत्र्यांची संख्या पाहता ती २० हून अधिक असल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.

मृत कुत्र्यांची विल्हेवाटकरार शहरात गुरुवारी अन्नातून विषबाधा होऊन कुत्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याची माहिती कराड पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृत कुत्र्यांची विल्हेवाट लावली.

पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनमोकाट कुत्री गुरुवारी सकाळी मृत पावल्यानंतर संबंधित कुत्र्यांना कराडच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेण्यात आले. या ठिकाणी कुत्र्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर संबंधित कुत्र्यांचा मृत्यू हा अन्नातील विषबाधेतून झाला असल्याचे प्राथमिक माहिती देण्यात आली.मेनका गांधींचा पोलिसांशी संवादशहरातील बेवारस श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामागे विषबाधेचा संशय असल्याने प्राणिमित्रांनी याबाबत नगरपालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार देण्याची मागणी केली. याबाबत पालिका प्रशासनाने हात वर केल्यानंतर प्राणिमित्रांनी पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी सुरुवातीला पोलिसांनी नगरपालिकेकडून तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Poisoning kills stray dogs in Karad; Animal lovers protest.

Web Summary : Over twenty stray dogs died in Karad due to suspected food poisoning. Animal activists filed a police complaint, prompting an investigation into the incident. Autopsies confirmed poisoning. The municipality disposed of the carcasses.