कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 15:03 IST2018-09-06T15:02:28+5:302018-09-06T15:03:58+5:30
सातारा जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप
सातारा : जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे प्रमुख धरणे काठोकाठ भरली आहेत. पाण्याची आवक होत असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नद्यांना पूर आले होते.
सध्या गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे.