शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टाळण्यासाठी विवाहाला ऑनलाइनचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोनामुळे लग्नसराईच्या थाटामाटाला बगल फाटा देत ठराविक आप्तेष्टांच्या हजेरीत लग्नसोहळा पार पडत आहे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोनामुळे लग्नसराईच्या थाटामाटाला बगल फाटा देत ठराविक आप्तेष्टांच्या हजेरीत लग्नसोहळा पार पडत आहे. मात्र, झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होऊन दोषी होण्यापेक्षा वधू-वरपक्षाकडून वेगळीच शक्कल लढवली जात आहे. ठरविलेल्या लग्नाला आप्तेष्ट अतिमित्रांनी हजेरी तर लावलीच पाहिजे. शासनाचे नियम पाळून कोरोनाच्या महामारीत नातेवाइकासंह मित्रांच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे, यासाठी ऑनलाइन शिक्षणाप्रमाणे शक्कल लढवून व्हॉटस्ॲपवर पत्रिका पाठविताना लिंकही पाठवून विवाह सोहळ्याचे आमत्रंण दिले जात आहे.

सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना शासनाने लग्नसभारंभासह विविध क्रार्यक्रमांवर बंधने लादली आहेत. नियमभंग केल्यास मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो आणि विनाकारण केलेल्या गर्दीतून रुग्ण वाढून आपल्या जवळचे मित्र अथवा नात्यातील माणसे गमावण्याचे दु:खद प्रसंगही ओढवले आहेत. लग्नसराईतील कार्यक्रमांना फक्त पन्नास लोकांची मर्यादा घालून दिल्याने ‘इतका जवळचा असूनही त्या पन्नासमध्ये माझा समावेश नाही’ या टोमण्यांनी अनेकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नातीगोतीगोती तुटून नाहक गैरसमज पसरतात तर अबोलाही कायमस्वरूपी राहतो. यामुळे या सर्वांतून सुयोग पर्याय काढून ऋणानुबंधही ठिकून राहावे प्रत्येकाची आरोग्याची काळजीही घेतली जाईल व सन्मानाने विवाहाला आमंत्रित करता येईल, असा एकविसाव्या शतकातील आधुनिक पर्याय म्हणून ऑनलाइन पत्रिका पाठवून त्यात विवाह सोहळा पाहता यावा म्हणून पत्रिकेतून ऑनलाइन लिंक पाठवली जात आहे. त्यामुळे कोणी हजेरी लावली हेही कळणार आहे. या अनोख्या माध्यमातून काहीना कमी वेळेत अनेक लग्नही लावता येणार आहेत.

चौकट...

ऑनलाइन पत्रिकेची अन् लिंकची चर्चा...

कोरोना काळातील या ऑनलाइनमुळे काहींना जवळच्या नातेवाइकांच्या लग्नात हजर असूनही इतर सोहळ्याला हजेरी लावता येणार आहे. या ऑनलाइन पत्रिकेची आणि लिंकची सर्वत्र चर्चा असून, सध्याच्या स्थितीत याच पर्यायांची गरज असल्याचेही बोलले जात आहे; परंतु मित्र आणि नातेवाईक लग्नाचा आहेर ऑनलाइन देणार की प्रत्यक्ष देणार याबाबत खमंग चर्चा सुरू आहेत.

फोटो

संग्रहित लग्नसराईचा फोटो वापरणे