कऱ्हाड तालुक्यातील ऑनलाईन ग्रामसभा कोरोनापूर्तीअभावी तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 15:57 IST2021-06-01T15:54:07+5:302021-06-01T15:57:09+5:30
CoronaVirus Online Satara Karad : कऱ्हाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सोमवारी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते. परंतु ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत सविस्तर माहिती नसल्याने बहुतेक ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ऑनलाईन ग्रामसभेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

कऱ्हाड तालुक्यातील ऑनलाईन ग्रामसभा कोरोनापूर्तीअभावी तहकूब
कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सोमवारी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते. परंतु ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत सविस्तर माहिती नसल्याने बहुतेक ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ऑनलाईन ग्रामसभेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
संपूर्ण जगाला गेल्या दीड वर्षांपासून वेठीस धरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात सामाजिक अंतराचा वापर करून मिटिंग, सेमिनार, ्अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. अशाच पद्धतीने ग्रामपंचायतीचे ग्रामसभा घेण्याचे आयोजन बहुतेक ग्रामपंचायतींनी सोमवारी केले होते. यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी निश्चित केला आहे.
या पंचेचाळीस मिनिटांच्या कालावधीत संपूर्ण सोपस्कार पार पाडून सर्व विषयांची माहिती तसेच मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. यासाठी लोकसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमीत कमी शंभर लोकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ऑनलाईन मिटिंग किंवा ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागातील लोकांसाठी नवीन किंवा कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या लोकांना यामध्ये फारसा रस नसल्याने किंवा या ऑनलाईन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे ॲप अशा संगणकीय प्रणालीची माहिती नसल्याने या सभेला ऑनलाईन उपस्थित राहता न आल्याने अनेक ग्रामसभेला कोरम पूर्ण न होऊ शकल्याने त्या तहकूब करण्यात आल्या.