कऱ्हाड लाचप्रकरणी आणखी एकास अटक

By Admin | Updated: July 11, 2014 23:18 IST2014-07-11T23:11:26+5:302014-07-11T23:18:04+5:30

लॉज परवाना : गायब मध्यस्थ अखेर ताब्यात

One more arrest in Karhad bribery case | कऱ्हाड लाचप्रकरणी आणखी एकास अटक

कऱ्हाड लाचप्रकरणी आणखी एकास अटक

कऱ्हाड : लाचप्रकरणामध्ये मध्यस्थी करून लाच मागणीत सहभागी असलेल्या एकास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. प्रदीप तानाजीराव शिर्के (वय ३६, रा. नांदलापूर, ता. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लॉज व्यावसायिकाला लाच मागितल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी सातारच्या लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. त्यामध्ये प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार राजेंद्र विठ्ठलराव जाधव व हवालदार डी. एम. कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती.
या प्रकरणामध्ये मध्यस्थी करणाऱ्या प्रदीप शिर्के याच्यावर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा नोंद होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. शुक्रवारी त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One more arrest in Karhad bribery case