शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:03 IST

पादचाऱ्यांना ठोकरले; चालक ताब्यात

वाई : वाई बसस्थानकासमोरील महाबळेश्वर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव कारने पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये एकजण ठार तर चाैघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. तर वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वाई बसस्थानकासमोर कार (एमएच,०४ जीई, ६६९५) भरधाव वेगात आली. या कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या काही पादचाऱ्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर कार त्याच वेगात पुढे गेली. यामुळे कारच्या धडकेत एक पादचारी ठार झाला. राजेंद्र बजरंग मोहिते ( रा. सोळशी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे.तर अक्षय नामदेव कदम आणि अविनाश केळगणे (रा. वारोशी, ता. महाबळेश्वर) सीताराम धायगुडे (पूर्ण नाव नाही रा. वाई) आणि शिवांश जालिंदर शिंगटे (रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना वाई आणि सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हसन बोरवी (रा. कोरची, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले आहे.

चालकाला चोप; तिघेजण गेले पळून..हा अपघात झाला त्यावेळी पदचारी हे वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून घरी चालले होते. अपघात झाल्यानंतर वाई बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. तसेच अपघातानंतर नागरिक आणि आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी वाहन अडवून चालकाला चोप दिला. यावेळी कारमधील तिघेजण पळून गेले, अशी माहिती परिविक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक श्याम पानेगावकर यांनी दिली. तर याप्रकरणी वाई ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईAccidentअपघातDeathमृत्यू