शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: महामार्गावरील गतिरोधकामुळे गेला एकाचा बळी, एसटीला दुचाकीची पाठीमागून धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:34 IST

गतिरोधकामुळे अपघात होऊन एकाचा बळी गेल्यामुळे नागरिकांमधून संताप

माणिक डोंगरेमलकापूर : गतिरोधकामुळे एसटी चालकाने अचानक ब्रेक मारताच पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटून पाठीमागून एसटीला धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा आज, मंगळवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. वैभव विलास सोनके (वय ३२, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे मृत युवकाचे नाव आहे.

पुणे-बंगळूरू महामार्गावर एका हॉटेलसमोर काल, सोमवारी हा अपघात झाला. अपघाताची कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. महामार्गावरील गतिरोधकामुळे अपघात होऊन एकाचा बळी गेल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.अपघातस्थळी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सोनके हे दुचाकी (एमएच ५० ई २६१४) वरून कामानिमित्त पाचवड फाट्याकडे गेले होते. काम आटोपून घरी मलकापूरला परतत असताना शिवार हॉटेलसमोर आले असता वेंगूर्ला-स्वारगेट बस (एमएच २० बीएल ४०८०) च्या चालकाने महामार्गावर गतिरोधक दिसताच ब्रेक मारला. यावेळी वैभव सोनके यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात धडकली. यात सोनके यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले.यावेळी नागरिकांनी सोनके यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील अपघात विभागाचे हवालदार प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. वैभव सोनके हे आई-वडिलांना एकुलते एक होते. त्यांना पत्नी व दोन लहान मुले आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू