शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

४३ ग्रामपंचायतींची शंभर टक्के करवसुली

By admin | Updated: April 19, 2015 00:37 IST

पाटण तालुका : चार गावांचा अ‍ॅडव्हान्स वसुलीचा विक्रम

पाटण : न्यायालयाची धास्ती, गटविकास अधिकाऱ्यांचा पाठपुरावा आणि ग्रामसेवकांची कार्यतत्परता, असा त्रिवेणी संगम जुळून आल्यामुळे पाटण तालुक्यातील २४१ पैकी ४३ ग्रामपंचायतींची २०१४-१५ या वर्षात शंभर टक्के करवसुली झाली आहे. यामुळे संबंधित गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चार गावांची अ‍ॅडव्हान्स वसुलीही झाली आहे. पाटण तालुक्यातील कोदळ (पुनर्वसन), विरेवाडी, पाठवडे, डांगिष्टेवाडी, कळंबे, कुशी, निवडे (पुनर्वसन), भांबे, रामिष्टेवाडी, कवडेवाडी, सुरूल, टोळेवाडी, कारवट, मान्याचीवाडी, काठी, सुळेवाडी, सावरघर, बांधवट, पाबळवाडी, काहीर, डोंगळेवाडी, आसवलेवाडी, भिलारवाडी, गव्हाणवाडी, गोठणे, महिंद, बाचोली, कारळे, पाळशी, पाणेरी, मराठवाडी, धजगाव, कळकेवाडी, मत्रेवाडी, साखरी, बनपेठवाडी, शितपवाडी, नाणेल, भारसाखळे, सडावाघापूर, शिद्रुकवाडी, सातर, भूडकेवाडी या ४३ गावांची शंभर टक्के करवसुली झाली आहे. पाटण तालुक्याच्या इतिहासात प्रथमच अशी वसुली झाली आहे. तसेच यापुढेही जाऊन २०१५-१६ या सालासाठी दि. १ एप्रिलपर्यंत चार गावांनी शंभर टक्के अ‍ॅडव्हान्स करवसुली करून वेगळा विक्रम केला आहे. ४३ गावांनी १०० टक्के करवसुली केली असल्याने संबंधित गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)