From one house to another, with a sharp weapon; Crime on all three | घराच्या वाटणीवरून एकावर धारदार शस्त्राने वार ; तिघांवर गुन्हा

घराच्या वाटणीवरून एकावर धारदार शस्त्राने वार ; तिघांवर गुन्हा

ठळक मुद्देघराच्या वाटणीवरून एकावर धारदार शस्त्राने वार सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

सातारा : घराच्या वाटणीच्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत विकास माने, स्नेहा अभिजीत माने, किर्ती विलास माने (सर्व रा.पंताचा गोट, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रविण दत्तात्रय माने (वय ५५, रा.पंताचा गोट, सातारा) यांचा वरील संशयितांमध्ये घराच्या वाटणीवरून जुना वाद आहे. या कारणातून दि. १९ रोजी रात्री साडेआठ वाजता संबंधितांनी प्रवीण माने यांचे हातपाय घट्ट धरून अभिजीत याने धारधार हत्याराने माने यांच्या पायावर व दंडावर वार केले.

त्यानंतर संबंधित संशयित तेथून पळून गेले. जखमी माने यांनी उपचार घेतल्यानंतर दि. २० रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. हवालदार जे.डी.पवार हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: From one house to another, with a sharp weapon; Crime on all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.