Satara News: घरात रंगकाम करताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
By दत्ता यादव | Updated: January 23, 2023 13:40 IST2023-01-23T13:40:15+5:302023-01-23T13:40:38+5:30
ग्रॅन्डरची वायर ही अचानक लोखंडी पायाटखाली आली. अन् बसला विजेचा जोराचा धक्का

Satara News: घरात रंगकाम करताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
सातारा : घरात रंगकाम करताना शाॅक लागून नितीन तात्याबा कदम (वय ४५, रा. दाैलतनगर, ता. सातारा मूळ रा. साप, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी (दि. २२) घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन कदम हे रविवारी वासोळा येथील एका घरामध्ये रंगकाम करत होते. स्लॅप घासण्यासाठी सुरू असलेल्या ग्रॅन्डरची वायर ही अचानक लोखंडी पायाटखाली आली. त्यामुळे लोखंडी पायाटमध्ये वीजप्रवाह उतरला. या पायाटवर उभे राहिलेल्या नितीन कदम यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार डोंबाळे हे अधिक तपास करीत आहेत.