शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गुरुजींची माहिती एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:47 IST

आॅनलाईन बदली प्रक्रियेबरोबरच अन्य बाबींमध्ये शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेकडे संग्रहित असावी म्हणून शिक्षकांच्या माहितीचे मॅपिंग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.

ठळक मुद्दे मॅपिंग अंतिम टप्प्यात : चुकीची माहिती देणाऱ्या शिक्षकांवर चाप

सातारा : आॅनलाईन बदली प्रक्रियेबरोबरच अन्य बाबींमध्ये शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेकडे संग्रहित असावी म्हणून शिक्षकांच्या माहितीचे मॅपिंग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे गुरुजींची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दरवर्षी संगणक प्रणालीवर मॅपिंग करावे लागू नये म्हणून यावर्षी सर्व शिक्षकांचे मॅपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत शिक्षकांच्या माहितीचे संकलन करताना फक्त बदलीपात्र शिक्षकांचे नव्हे तर सर्व शिक्षकांच्या माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. यामुळे संगणक प्रणालीत सर्व शिक्षकांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, शिक्षकांची बदली प्रक्रिया व सेवानिवृत्ती ३१ मे पूर्वी होते. अशा शिक्षकांना संगणक प्रणालीत मॅप न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे शिक्षक संगणक प्रणालीत मॅप करण्यासाठी सिस्टीमद्वारे दाखवले जाणार नाहीत. तसेच अशा शिक्षकांचे पद संगणक प्रणालीत रिक्त म्हणून नमूद करण्याचे सूचित केले आहे. ज्या शाळांमध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही, अशा शून्य शिक्षक असलेल्या शाळांना मॅप करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.चुकीची माहिती देणारे रडारवरचुकीची माहिती भरून मागील वर्षी बदली करून घेतलेल्या दोषी शिक्षकांना संगणक प्रणालीमध्ये मॅप करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून यापूर्वीच कारवाई झाली आहे, त्या शिक्षकांना या सुविधेमध्ये मॅप करता येणार नाही. दोषी असलेल्या ज्या श्क्षिकांवर उद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, फक्त अशाच शिक्षकांना या सुविधेंतर्गत मॅप करण्याचे सुचित करण्यात आले आहे. दोषी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शाळेत एक जागा रिक्त दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे. 

मॅपिंग प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे शासनाकडून कोणतीही माहिती लपून राहणार नाही. याचा फायदा आॅनलाईन बदली प्रक्रियेसाठीही होणार आहे.- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :Teacherशिक्षकSatara areaसातारा परिसर