शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माउलींचा सोहळा पाऊससरी झेलत सातारा जिल्ह्यातून पुण्याकडे मार्गस्थ, परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:45 IST

वारकऱ्यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले

लोणंद : आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पावसाच्या सरी झेलत साताऱ्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज होता. परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले.संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा सोमवार, दि. १४ रोजी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मुक्काम होता. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली. पावसाच्या सरी अंगावर झेलत सकाळी आठ वाजता पालखी सोहळा नीरा नदीकिनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माउलींच्या पादुका सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे नीरा नदीतील स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, देखणे, योगी निरंजननाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ज्ञानोबा माउली.. ज्ञानोबा माउली..’च्या जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घातले.माउलींचे स्नान सुरू असताना सोहळ्यासोबत आलेले पुरुष विणेकरी, पताकाधारक व तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी ब्रिटिशकालीन पुलावरील रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथामागील व नंतर रथापुढील विणेकऱ्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा ‘माउली..माउलीं’च्या जयघोषात पावसाच्या सरीत मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला.यानंतर माउलींच्या सोहळ्याने सकाळी नऊ वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत माउलींची पालखी विठ्ठल मंदिरात साडेनऊच्या सुमारास विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दुपारी दोन वाजता हा सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्थ झाला.