शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Satara: कंटेनरच्या चाकाखाली अडकल्याने दुचाकीचा जाळ-धुर संगटच, पाठलाग करून चालकाला बेदम चोप

By दीपक शिंदे | Updated: September 5, 2023 18:34 IST

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने चाकात अडकलेली दुचाकी तीन किलोमीटर फरपटत नेली. कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीच्या जाळ-धुराचा थरार ...

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने चाकात अडकलेली दुचाकी तीन किलोमीटर फरपटत नेली. कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीच्या जाळ-धुराचा थरार अनुभवाला मिळाला. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने पाय काढून घेतल्यामुळे अनर्थ टळला. पाच किलोमीटर पाठलाग करून कंटेनर चालकाला पकडून बेदम चोप दिला. हा अपघात पाचवड फाटा ते कोयना वसाहत परिसरात काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अजय काशीनाथ साळुंखे (रा. व्हनगळ, गोवे, ता. सातारा) हे सातारा येथील कदम इंजिनिअरिंग येथे नोकरी करतात. सोमवारी पाच वाजता कामावरून सुटी झाल्यावर ते दुचाकी (एम एच ११ बीबी ५०८१) वरून ओंड येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या पत्नीकडे गेले होते. घरातल्यांना भेटून रात्री परत गावाकडे जात होते. ओंडवरून निघाल्यानंतर चांदोलीकडून कऱ्हाडच्या दिशेने निघालेल्या कंटेनर (एचपी ६४ ए २४७६) चा चालक भरधाव वेगात चालवत होता. साळुंखे यांनी कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे आले. फोन आला म्हणून ते पाचवड फाटा येथे चौकातच गाडी एका दुकानासमोर लावून गाडीशेजारी उभे होते. पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनर चालकाने साळुंखे दुचाकीसह थांबलेल्या वळणावर दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी कंटेनरच्या मधल्या चाकात अडकवून पाचवड फाटा ते विरंगुळा हॉटेल तीन किलोमीटर फरपटत नेली. यावेळी महामार्गावर दुचाकी घासून जाळ धूर व ठिणग्या उडत होत्या.हॉटेल विरंगुळाजवळ आले असता कंटेनरचा टायर फुटल्याने मोठा आवाज झाला. अडकलेली दुचाकी यामुळे महामार्गावर पडली. मात्र चालकाने कंटेनर तसाच पळवला. दुचाकी मालकासह नागरिकांनी कंटेनरचा कोयना वसाहतीपर्यंत पाठलाग करून पकडले. खाली उतरवून बेदम चोप दिला. तोपर्यंत या अपघाताची माहिती पोलिसांसह महामार्ग देखभाल विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच अपघात विभागाचे हवालदार धारज चतूरसह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवून रूग्णालयात दाखल केले. तर पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गAccidentअपघातPoliceपोलिस