दुर्दैवी! मधमाश्या चावल्याने वृद्धाचा मृत्यू; पाटखळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 17:55 IST2022-05-02T17:55:02+5:302022-05-02T17:55:20+5:30
सातारा : मधमाश्या चावल्याने पाटखळ, ता. सातारा येथील आनंदराव कृष्णा जानकर (वय ७३) यांचा उपचारापूर्वीच रुग्णालयात मृत्यू झाला. ही ...

दुर्दैवी! मधमाश्या चावल्याने वृद्धाचा मृत्यू; पाटखळ येथील घटना
सातारा : मधमाश्या चावल्याने पाटखळ, ता. सातारा येथील आनंदराव कृष्णा जानकर (वय ७३) यांचा उपचारापूर्वीच रुग्णालयात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. १ मे रोजी पाटखळ येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंदराव जानकर आणि अन्य एक व्यक्ती पाटखळ येथील शेतात गेली होती. त्यावेळी शेतातील गवत पेटविल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात धूर झाला. या धुरामुळे आग्या मधमाशांचे पोळ उठलं. या माशांनी जानकर यांच्या अंगावर झडप घातली. तोंड, नाक, कान, डोके, हाता पायावर अशा सर्वच ठिकाणी माशांनी त्यांचा चावा घेतला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार सुहास पवार हे अधिक तपास करीत आहेत.