वृध्द शेतकऱ्याचा घेतला कानाचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:54+5:302021-06-16T04:50:54+5:30
सातारा: तालुक्यातील तासगाव येथे वयोवृध्द शेतकऱ्याला मारहाण करुन त्याच्या उजव्या कानाचा चावा घेतल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ...

वृध्द शेतकऱ्याचा घेतला कानाचा चावा
सातारा: तालुक्यातील तासगाव येथे वयोवृध्द शेतकऱ्याला मारहाण करुन त्याच्या उजव्या कानाचा चावा घेतल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश हणमंत किर्वे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, श्रीरंग शंकर गंधाले (वय ७०, रा. तासगाव, ता. सातारा) हे शेतकरी आहेत. दि. १३ रोजी प्रथमेश हणमंत किर्वे (रा. तासगांव, ता. सातारा) याने कुंड नावाच्या शिवारात असणाऱ्या श्रीरंग गंधाले यांच्या शेतातून ट्रॅक्टर नेला. ''तुम्ही माझ्या शेतातून ट्रॅक्टर का नेला,'' अशी याची विचारणा किर्वे याला करताच त्याने गंधाले यांना चिडून जावून शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करुन खाली पाडले आणि तेथेच दगडाने डोके, खांद्यावर मारहाण केली. या वेळी त्याने उजव्या कानाचा चावा घेतला. यात श्रीरंग गंधाले जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर श्रीरंग गंधाले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देताच प्रथमेश किर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.