शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्कीला टाळे ठोकताच अधिकारी ‘जमींपर’!

By admin | Updated: October 25, 2015 23:50 IST

कडवे खुर्द : ग्रामपंचायतीला चुना लावणाऱ्या कंपन्या ताळ्यावर; हद्दीप्रमाणे कर देण्याचे आश्वासन

तारळे : कडवे खुर्द, ता. पाटण ग्रामपंचायतीने कर चुकवेगिरी करणाऱ्या तीन पवनचक्क्यांना टाळे ठोकले, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर मागणीला केराची टोपली दाखवत मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांसमोर जाऊन नकाशाच्या हद्दीप्रमाणे ग्रामपंचायतीला कर देण्याचे आश्वासन द्यावे लागले. भूमिअभिलेख कार्यालयातून मिळालेल्या सर्व्हेनंबर व गटनंबरच्या चुकीच्या नकाशाचा आधार घेत व अन्य ग्रामपंचायतीला कर देत असल्याचे खोटे सांगून सुमारे पंधरा वर्षांपासून कडवे खुर्द ग्रामपंयातीला कर देण्यासाठी तीन पवनचक्क्या टाळाटाळ करत होत्या. अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही पवनचक्की कंपन्यांची मुजोरी चालूच होती. उपसरपंच भाऊराव सपकाळ यांना याबाबत शंका आल्याने गेल्या चार वर्षांपासून त्यांनी पाठपुरावा सुरू केल्यावर गावच्या सर्वे नंबरच्या व गटाच्या नकाशातील चूक त्यांच्या निदर्शनास आली. ती चूक दुरुस्त करण्यासाठी भूमिअभिलेखच्या पाटण व सातारा कार्यालयाकडे दाद मागितली. तरीही दोन्ही ठिकाणी त्यांची निराशा झाली. २००६ मध्ये झालेल्या वादानंतर कंपनीने त्या क्षेत्राची मोजणी केल्यावर कडवे खुर्दच्या हद्दीतच पवनचक्क्या असल्याचे स्पष्ट झाले. पण, चुकीच्या नकाशाचाच धागा पकडून पवनचक्क्यांची मुजोरी सुरूच आहे. अनेक प्रकारचे अर्ज विनंत्या करूनही कंपनी सहकार्य करत नसल्योन वैतागलेल्या ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिला. तरीही डोळेझाक करणाऱ्या कंपनीला ताळ्यावर अणण्यासाठी ग्रामपंचायतीने तिन्ही पवनचक्क्यांना टाळे ठोकले. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच चुकीच्या आधारावर हवेत असणारे अधिकारी ताळ्यावर आले व त्यावर तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसमोर येण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर) नाक दाबल्यावर तोंड उघडले !सर्व्हे नंबर व गट नंबरच्या नकाशाच्या हद्दी चुकीच्या दाखविल्या गेल्याचे त्याचा गैरफायदा घेत तीन पवनचक्क्या ग्रामपंचायतीला कर देण्यास टाळत होत्या. अर्ज विनंत्यांना केराची टोपली दाखविणाऱ्या कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये रोष होता. इशारा देऊनही न समजणाऱ्या कंपन्यांना ताळ्यावर आणण्यासाठी ग्रामस्थांनी अखेरचे पाऊल उचलून टाळे ठोकल्यानंतर कंपनीला जाग आली. त्यामुळे नाक दाबल्यावर तोंड उघडले असे ग्रामस्थांनी सांगितले.