श्रमदानासाठी आता ‘कॉल टू अॅक्शन’ उपक्रम पाणी फाउंडेशन : ७५ हजार जलमित्रांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:57 IST2018-04-19T23:57:07+5:302018-04-19T23:57:07+5:30
सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार

श्रमदानासाठी आता ‘कॉल टू अॅक्शन’ उपक्रम पाणी फाउंडेशन : ७५ हजार जलमित्रांचा सहभाग
सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार लोक जलमित्र बनून गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत.
दुष्काळी गावात श्रमदानासाठी सिनेस्टार, प्रशासकीय अधिकारी मैदानात उतरले असताना शहरी भागात राहणारे मात्र ज्यांना दुष्काळीची कधी झळ पोहोचलेली नाही, असे समाजातल्या विविध क्षेत्रांतले लोकसुद्धा यात उतरण्यास इच्छुक होते. त्यांच्यासाठी जलमित्र कॉल टू अॅक्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी ७५ हजार लोकांनी नोंदणी करून या गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत. नुकतेच या जलमित्रांसाठीचे सर्वात पहिले प्रशिक्षण सत्र तासगाव, कोरेगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये दिले गेले.
जलमित्र ग्रामस्थांना करणार मार्गदर्शन
जलमित्रांना पाणी फाउंडेशनचे अॅप कसे वापरायचे? (हे अॅप गावातील किती भाग पाणलोटाखाली आला आहे, याची नोंद करते आणि मागोवा घेते), हे गावकऱ्यांना शिकविणार आहेत. याच्या पाठोपाठ जमिनीच्या परीक्षणासाठी देखील अशाच प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन केले गेलेले आहे. याशिवाय अनेक जलमित्रांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.
महाराष्ट्र दिनी महाश्रमदान
आता १ मे रोजी आयोजित महाश्रमदानाच्या उपक्रमाला अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. तुमच्यापैकी अनेकांनी त्यासाठी आपली नावनोंदणीसुद्धा केलेली असेल. त्यामुळे महाराष्ट्रदिन हा महाश्रमदिन होणार आहे.