पुण्यातील कुख्यात गुंड परवेज शेखला साताऱ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:00 IST2020-03-19T14:59:12+5:302020-03-19T15:00:38+5:30

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड व खंडणी, खूनाचे गुन्हे दाखल असलेल्या परवेज शेख याला सातारा व पुणे गुन्हे ...

Notorious gangster Pune Parikh Sheikh arrested in Satara | पुण्यातील कुख्यात गुंड परवेज शेखला साताऱ्यात अटक

पुण्यातील कुख्यात गुंड परवेज शेखला साताऱ्यात अटक

ठळक मुद्देपुण्यातील कुख्यात गुंड परवेज शेखला साताऱ्यात अटकस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन पिस्टलसह चाळीस काडतुसे जप्त

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड व खंडणी, खूनाचे गुन्हे दाखल असलेल्या परवेज शेख याला सातारा व पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.

संगम माहुली येथील एका मंदिरात बसलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन पिस्टल व चाळीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, परवेज हनिफ शेख (रा. गंगानगर, हडपसर) याच्यावर सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असून, सध्या तो पुणे येथे वास्तव्यास आहे. त्याच्यावर पुणे येथील एका व्यापाऱ्याच्या खंडणीसाठी खून केल्याचा आरोप असून पोलीस त्याचा शोध घेत होते.

परवेज हा दि. १७ रोजी साताऱ्यातील संगम माहुली परिसरात आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून परवेज थांबलेल्या संगम माहुली येथील मंदिराची माहिती दिली. त्यानंतर साताऱ्यातील पोलिसांनी संगम माहुली येथे जाऊन परवेजला अटक केली.

Web Title: Notorious gangster Pune Parikh Sheikh arrested in Satara