वाई मतदारसंघात ६१ जणांना हद्दपारीची नोटीस
By Admin | Updated: September 16, 2014 23:56 IST2014-09-16T21:40:52+5:302014-09-16T23:56:12+5:30
प्रांताधिकारी खेबुडकर यांची माहिती

वाई मतदारसंघात ६१ जणांना हद्दपारीची नोटीस
वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघ कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी ६१ जणांना हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात वाईतील २५, खंडाळा तालुक्यातील ३१ व महाबळेश्वर तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. अशी माहिती निवडूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी खेबुडकर यांनी दिली.
ते म्हणाले वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, सर्व पथके हॉटेल व्यावसायिक व सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रांताधिकारी म्हणाले, वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदार संघात एकूण तीन लाख १२ हजार १६१ मतदार असून त्यात स्त्री मतदार १ लाख ५३ हजार १९४ तर पुरूष मतदार एक लाख ५८ हजार ९६७ असून मतदार नोंदणी निरंतर प्रक्रिया ही नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या अंतीम दिवसापर्यंत चालू राहणार आहे.
यावेळी यावेळी तहसीलदार सदाशिव पडदुणे, शिवाजीराव तळपे, अतुल म्हेत्रे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मतदारसंख्या वाढणार
वाई तालुक्यात एक लाख ५६ हजार ४९६, खंडाळा तालुक्यात एक लाख तीन हजार ६०६ तर महाबळेश्वर तालुक्यात ५१ हजार ८९७ एवढे मतदार असून यात आणखी नवीन मतदारांची भर पडणार आहे. अशी माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी खेबुडकर यांनी दिली आहे.