मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा

By नितीन काळेल | Updated: December 3, 2023 16:24 IST2023-12-03T16:21:21+5:302023-12-03T16:24:09+5:30

"सत्तेच्या माध्यमातून राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, पण विजय सत्याचाच"

Not related to the Mumbai Bazar Committee scam; Former minister Shashikant Shinde claims | मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा

मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित शाैचालय घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले आहेत. पण, या प्रकारणाशी माझा कोणताही संबंध नाही. सत्तेच्या माध्यमातून राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, विजय सत्याचाच होईल, असा दावा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री शिंदे म्हणाले, मुंबई बाजार समितीतील कथित शाैचालय घोटाळ्याप्रकरणात माझ्यासह चार अधिकाऱ्यांना आरेाप आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. माझे राजकीय कार्य थांबविण्यासाठी राजकीय प्रयत्न केले जात आहेत. गेली २५ वर्षे कष्ट आणि लोकांच्या बळावर मी उभा आहे. तरीही राजकीय पातळी एेवढ्या खाली जाईल असे वाटले नव्हते. हुकुमशाही पध्दतीने अधिकाराचा गैरवापर करण्यात येत आहे. खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दाबण्याचा हा प्रकार आहे. पण, मी त्वेषाने काम करणार आहे.

Web Title: Not related to the Mumbai Bazar Committee scam; Former minister Shashikant Shinde claims