शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्र, राज्य सरकारकडून कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम - नाना पटोले 

By दीपक देशमुख | Updated: May 9, 2023 16:21 IST

ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांच्याच मुलांना शिक्षणे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे

सातारा : ‘एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदाचा उपयोग राज्याच्या हितासाठी करावा. सातारा जिल्ह्याने चार मुख्यमंत्री दिले आहेत. यापूर्वीची तीन मुख्यमंत्र्यांचा सातारी बाणा राखला, पण शिंदे यांचा बाणा कोठे गेला. खारघरच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्राच्या विचाराला काळिमा फासली आहे, त्यावेळी साताराचा मुलगा मुख्यमंत्री पदावर होता,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दरम्यान, कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.सातारा येथील काँग्रेस कमिटीत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा काँग्रेस निरीक्षक श्रीरंग नाना चव्हाण, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजित देशमुख, राजेंद्र शेलार, महिला अध्यक्ष अल्पना यादव व पदाधिकारी उपस्थित होते.पटोले म्हणाले, ‘कर्मवीर आण्णांनी गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. शाळा ही शिक्षणाची मंदिरे बनवली, पण आता त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना फाटा देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळू नये, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांच्याच मुलांना शिक्षणे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. 

जनाधार नाकारून ऑपरेशन लोट्समहाराष्ट्र सीमा भागातील लोकांचा रोष भाजपबाबत जास्त आहे. डबल इंजनचे सरकार द्या, म्हणत मताचा जाेगवा मागितला; पण शासनाने ट्रुबल इंजिनचे सरकार दिले आहे. जनतेने नाकारल्यानंतरही जनाधार नाकारून ऑपरेशन लोट्स करते. जनतेने त्यांना ऑपरेशन वापस करून नॅनो गाडीत बसविल्याचे एक्झिट पोलवरून दिसून येते. कर्नाटकमध्ये बजरंगबली काँग्रेसच्याच बाजूला राहिल.’महाविकास आघाडीत नाही तर जनतेत भाजप सरकारविरोधात धुसफूस जागा वाटपाबाबत त्यांना छेडले असता पटोले म्हणाले, येत्या महिनाभरात जागा वाटपासाठी बसणार आहे. जे कोणी भाजपाच्या विरोधात आमच्यासोबत लढायला तयार आहे, त्या लोकांना सोबत घेऊन चालणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागा वाटपाचा प्रश्न सुटेल. महाविकास आघाडीत धुसफूस नाही तर जनतेत भाजप सरकारविरोधात धुसफूस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी व गरिबी वाढत आहे. पहाटेचे सरकारबाबत पटोले मी केलेला आरोप नाही तर ते वास्तव आहे, असेही ते म्हणाले.बारसूत सरकारी बगलबच्चांच्या जमिनीबारसू येथे रिफायनरीचा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जनतेचे मत घेतले पाहिजे. सरकारच्या बगलबच्चांनी तेथे अगोदरच जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्यासाठी हा प्रकल्प उभा केला जात आहे काय? असा सवाल करून उद्योगामुळे तेथील निसर्ग संपविला जाणार असल्याचे संशोधक सांगत आहेत. तरीही विरोध करणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज केला जात आहे. तेथील जनतेसोबत काँगेस असल्याचे पटोले म्हणाले.सरकार असूनही आया-बहिणींना वाचवू शकले नाहीतनॅशनल क्राइम ब्युरोने गुजरातमधील ४० हजार स्त्रीया-मुली बेपत्ता झाल्याबाबत विचारले असता पटोले म्हणाले, सत्तेत बसूनही ते आपल्या आया-बहिणींचे रक्षण करू शकत नाहीत. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती असून, गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे भाजपकडून जनतेने अपेक्षा सोडली आहे. काश्मीर फाइल सिनेमा काढून त्यांनी काश्मिरी पंडितांवर कसा अन्याय होतो ते दाखवले. पण आज सरकार भाजपचेच आहे. आज काश्मीर खाेऱ्यात पंडितांची हत्या होत आहे. काश्मीर फाइल्स लोकांनी पाहिला नाही. यांनीच तिकिटे काढली, असल्याची टीका पटोले यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा