शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

डीपीवर नको; पण रस्त्यावरील तिरंगा उचला!

By admin | Updated: January 30, 2016 00:14 IST

डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट : प्रजासत्ताकदिनी सोशल मीडियावर जनजागृती

डीपीवर नको; पण रस्त्यावरील तिरंगा उचला!डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट : प्रजासत्ताकदिनी सोशल मीडियावर जनजागृतीदत्ता यादव -- सातारा --सोशल मीडियावर प्रासंगिक पोस्ट फॉरर्वड होत असतात. त्यामुळे या पोस्ट काहींना कटकटीच्या वाटतात, तर काहींना प्रेरणादायक वाटतात; परंतु यंदाच्या प्रजासत्ताकदिनी सोशल मीडियावरच्या ‘डीपीवर तिरंगा ठेवू नका; पण रस्त्यावर पडलेला तिरंगा उचला,’ अशी पोस्ट प्रत्येकाच्या मोबाइलवर झळकत होती. प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा या पोस्टला सगळ्यांनीच प्राधान्य देऊन बेफिकीर वागणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले.माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सध्याचा सोशलमीडिया प्रचंड जागृत झाला आहे. व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला आता एका क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते. एखादी कुठलीही घटना घडली की, काही क्षणातच त्या घटनेचे फोटो आणि त्याची थोडक्यात माहिती एका ग्रुपवर येते. त्यानंतर मग अशी पोस्ट ऐकमेकांना फॉरवर्ड केली जाते. गेल्या आठवड्यात अशाच काही महत्त्वांच्या पोस्ट व्हाट्सअ‍ॅपवर झळकत होत्या. त्यापैकी एक म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेसमोर केलेले उपोषण. या उपोषणाचे फोटो आणि रोजची माहिती ऐकमेकांना फॉरवर्ड केली जात होती. अगदी उपोषण सुटल्यानंतरही दोन दिवस आमदार गोरेंच्या उपोषणाच्या अनुषंगाने व्हाट्सअ‍ॅपवर पोस्ट झळकत होत्या. सगळ्यात दुर्दैवी पोस्ट ठरली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या संदर्भातली. त्यांच्या प्रकृती विषयाच्या उलट-सुलट पोस्ट सगळीकडे फॉरवर्ड होऊ लागल्या. शेवटी त्यांनी स्वत: रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मीडियासमोर तब्बेत ठणठणीत असल्याचे जाहीर केल्यानंतरच सोशल मीडियाने हात अखडता घेतला. अशा प्रकारच्या पोस्टमुळे सगळ्यांनाच मन:स्तापाला सामोरे जावे लागले.शहरात घडत असलेल्या घटनांवरही सोशलमीडिया लक्ष ठेवून असते. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने साताऱ्यात प्रथमच जिल्हा माहिती कार्यालयाकडून यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करण्यात आले, तसेच छायाचित्रे काढण्यात आली. पहिल्यांदाच हा उपक्रम राबविल्याने सातारकरांचा आनंद द्विगुणीत झाला. ही पोस्टही व्हाट्सअ‍ॅपवर सगळीकडे फॉरवर्ड झाली. साताऱ्यातील नक्षत्र प्रदर्शन असो, की सातारा बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना पाच रुपयांमध्ये जेवण देण्याचा उपक्रम. या बारिकसारीक गोष्टींची इत्थंभूत माहितीही व्हाटसअ‍ॅपवर झळकली. साताऱ्यातील रवींद्र शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘चिमणी वाचवा’ या उपक्रमालाही सोशलमीडियावर चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १३,५०० चिमणीच्या घरट्यांचे मोफत वाटप केल्याने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सोशलमीडियाने चांगली दखल घेतली. रस्तासुरक्षा सप्ताहानिमित्त हेल्मेटचे फायदे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडीही सोशलमीडियावर तत्काळ झळकत असतात; परंतु काही घटनांची शहानिशा न करताच त्या ऐकमेकांच्या ग्रुपवर फॉरवर्ड केल्या जातात. त्यामुळे पोलिसांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. अफवा पसरविणे हा सुद्धा गुन्हा आहे. हे माहीत असूनही अनेकजण फॉरवर्ड केलेली पोस्ट लगेच दुसऱ्या ग्रुपवर सेंड करत असतात. अशा पोस्टमुळे कोणाची बदनामी तर कोणाच्या जिवाशी येऊ शकते. त्यामुळे जागृत आणि सतर्क राहूनच सोशलमीडियाचा वापर करा, हा पोलिसांचा सल्ला दुर्लक्षित राहतो.

 

मनं हेलवणारी पोस्टप्रजासत्ताकदिनी यंदा प्लास्टिकचे छोटे तिरंगा झेंडे विक्रीस बंदी ठेवली असली तरी नकळत काही विक्रेते त्या दिवशी झेंडे विकत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून ही पोस्ट नक्कीच प्रेरणादायी ठरली. ‘येत्या ४८ तासांत भरपूर जणांचे देशप्रेम उफाळून येणार आहे. आपण भारतीय असल्याची आठवण काही तासांपुरती का होईना; पण प्रत्येकाला होणार आहे. फेसबुकवर तसेच व्हाट्सअ‍ॅपवर भारताचा तिरंगा अपलोड करा अथवा नका करू; परंतु रस्त्यावर पडलेला तिरंगा नक्कीच उचला...जय हिंद.!’स्वत: करा... प्लीज चेक !काहीजण अतातायीपणे कसलीही शहानिशा न करता दुसरीकडून आलेली पोस्ट जशीच्या तशी ‘प्लीज चेक’या शब्दासह पोस्ट करत असतात. अनेकदा या ‘प्लीज चेक’च्या पोस्टही बोगस निघतात. अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड झाल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही पोस्ट स्वत: चेक करूनच ती फॉरवर्ड केल्यास प्रशासनाचा मन:स्ताप तरी कमी होईल