शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री कुणीही असो, भाजपचे काम थांबणार नाही : जयकुमार गोरे; शंभूराज देसाई म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:11 IST

'सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे'

सातारा : ‘पाटणमध्ये पालकमंत्री कोणीही असो किंवा मंत्री कोणीही असो; भाजपच्या कार्यकर्त्यांचे कोणतेही काम अडणार नाही. सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,’ अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांना इशारा देतानाच निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.भाजपकडून रविवारी सातारा येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या पाटण तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘गटातटाचा विचार न करता आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समितीची लढाई लढायची आहे. राज्यात युती असली तरी पाटणमधील ही लढत मैत्रीपूर्ण असेल. या लढाईत भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला काहीही कमी पडू दिले जाणार नाही. इथे कोण मंत्री आहे याने फरक पडत नाही. तालुक्यात भाजपचे काम थांबणार नाही,’ असे सांगत त्यांनी शंभूराज देसाई यांना आव्हान दिले.मंत्री गोरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता पाटणचे राजकारण कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या बैठकीला भाजप पदाधिकारी उपस्थित होते.जयकुमार गोरे यांच्या डोक्यात सत्ता गेली : शंभूराज देसाईसातारा : पाटण विधानसभा मतदारसंघाबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, हे स्पष्ट करते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाटणकर गटाचे १०२ गावांमधील १९६६ प्रमुख कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केलेला आहे. हे लक्षात घ्यावे. पाटणची जनता याला भुलणार नाही, असा पलटवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्षांची युती करण्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीदेखील पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मी दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार, खासदार आणि दोन्ही मंत्र्यांना निमंत्रण पाठवले होते. मात्र, या बैठकीला भाजपचे दोन्ही मंत्री आले नाहीत.

भाजपने केवळ माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना चर्चेसाठी पाठवले होते. त्यांच्याशी चर्चा झाली मात्र निवडणुकीतील युतीचा निर्णय भाजपचे मंत्री आणि खासदार आमदार यांना विचारून घेऊ, असे त्यांनी सांगितले. दोन वेळचा अनुभव पाहता भाजपकडून युतीसंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळत नाही. आता शिंदेसेना म्हणून आमचे पदाधिकारी एकत्र बसून पुढील रणनीतीसंदर्भात निर्णय घेतील, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करूजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पालकमंत्री या नात्याने मी महायुतीतील घटक पक्षांची युती घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र, नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येदेखील भाजपकडून बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शिंदेसेना आपली भूमिका स्पष्ट करेन, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपाShambhuraj Desaiशंभूराज देसाईMahayutiमहायुतीElectionनिवडणूक 2026