शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
By प्रमोद सुकरे | Updated: March 1, 2025 15:31 IST2025-03-01T15:30:08+5:302025-03-01T15:31:11+5:30
कराड : महायुतीतील प्रत्येकालाच आप आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले असले, ...

शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
कराड : महायुतीतील प्रत्येकालाच आप आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले असले, अजित पवार तिरंगामय करु म्हटले असले तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित सामोरे जाऊ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कराड येथे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार डॉ.अतुल भोसले, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, रामकृष्ण वेताळ आदींची उपस्थिती होती.
प्रशांत कोरटकर यांना वाचवणारा कोणीही आका नाही. पोलीस लवकरच त्याला जेरबंद बंद करतील असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. तर एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. आमचे सरकार पारदर्शी आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी विरोधी पक्षात चांगले काम करावे. महाराष्ट्राची जनता संजय राऊत यांना आता ऐकत नाही असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
शरद पवारांनी शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..
शरद पवार सरकारच्या कामाच्या मूल्यमापनासाठी शँडो कँबिनेट स्थापन करणार आहेत? याबाबत छेडले असता मंत्री बावनकुळे म्हणाले, खरंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कारभाराबाबत ते शँडो कॅबिनेट चांगले काम करेल. शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी त्याचा या सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्याचा उपयोग होणार नाही असेही ते म्हणाले.