शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा: पृथ्वीराज चव्हाण; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 05:45 IST

लोकसभेच्या तयारीला लागा; पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकर्त्यांना सूचना.

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने आता नवे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा असेल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागा, असे सुचवले. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी ते म्हणाले, पुढील खासदार काँग्रेसचाच असेल. राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे. तर, मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

दरम्यान, या मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास खासदार काँग्रेसचाच होईल, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले. दरम्यान, २००९ मध्ये माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी, राष्ट्रवादीने ही जागा जिंकली. तर, २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील खासदार बनले. त्यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला. त्यानंतर, २०१९ मध्ये या जागेवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंमध्ये लढत झाली. त्यात, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला होता. मात्र, आता काँग्रेसने थेट या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत नेमके कोण ही जागा लढणार हे पाहावे लागेल.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा